हाती धनुष्य ज्याचा त्याला कसे कळावे
ह्रुदयी बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे
अशीच एक "कट्यार" नुकतीच माझ्या काळजात घुसली. तीचाच हा (पंच) नामा.
गेल्या पूणे-वारी मध्ये श्वसुरगृह जवळ करण्यासाठी बस पकडण्यासाठी मी मुख्यरस्त्याशी आलो. मुख्यरस्त्याचा मुखडा पूर्णपणे बदलला होता. पूण्यातील खड्डे नाहीत अश्या खूप कमी रस्त्यांपैकी एक असणारा रस्ता अचानक भारत-पाकिस्तानची फ़ाळणी झाल्यासारखा तीन तुकड्यांमध्ये विभागला गेला होता. दोन्ही बाजुना धन-धान्यानी भरलेली तटे सांभाळत एखादी नदी वाहात आहे असे वाटत होते. फ़क्त या नदीची दोन्ही तटे धान्याऐवजी ट्राफ़िक मध्ये अडकलेल्या वहानांनी गच्च भरली होती.
नदीचे पात्र (म्हणजे मधला रस्ता हो!) मोकळाच होता. त्या रस्त्याच्या आजुबाजुला ट्वेंटी-ट्वेंटी म्याच मध्ये खेळाडुना बसवतात तशी अर्ध्या कापलेल्या इग्लू सारखी झोपडी वजा जागा होती. थोडे वेळ निरक्षण केल्यानंतर असे जाणवले की ती तर नवी बस स्टॊपची शेड आहे.
त्या शेड्पर्यंत पोचता-पोचताच accident मध्ये लोक टपकावेत अशा उदात्त हेतूनी तो तिथे रोड्च्या मध्यभागी बांधलेला दिसत होता. आपले माणसे मारण्याचे काम पी यम टी ने असे private sector ला outsource केलेले पाहुन गदगदुन आले. झेब्रा क्रॊसिंग व इतर प्रवाश्यांच्या सहाय्याने आम्ही शेड्पर्यंत पोचलो. मावळ्यांच्या व घॊरपडीच्या सहाय्याने बालेकिल्ल्यापर्यंत पोचल्यानंतर तानाजीच्या आवेशात आम्ही त्या शेड मध्ये शिरलो. फ़क्त "हर हर महादेव" वगैरेच बाकी होते.
स्टोप आहे पण रस्त्याच्या कडेला नाही, मध्यावर आहे पण ट्राफ़िक दिसत नाही, सीट्स आहेत पण बसता येत नाही (या सीट्स कोणाच्या पार्श्वभागाच्या मापानी बनवतात काय ठावूक?), शेड आहे पण उभे रहाता येत नाही अश्या त्या ठिकाणी आम्ही हिरण्यकश्यपू जसा नरसींहाच्या मांडीवर अवघडल्यासारखा झोपला असावा तसे आम्ही त्या सीट्स वर बसून राहिलो.
व्ही आर एलच्या मालकीची वाटावी अशी एक लाल बस समोर येउन उभी राहिली. कितितरी दशकांची धुळीची पुटे ही पी यम टी ओळखण्याची पहीली खुण न जुळल्यामुळे मी त्या बसकडे दुर्लक्ष केले. पण आजुबाजुच्या प्रवाश्यानी त्या बसच्या दरवाज्याजवळ झुंबड केली. मी देखील त्यांबरोबर गेलो. हे सर्व थोडे विचीत्रच होते. एक तर बसला दरवाजा होता आणि तो बंद होता. कुणीही हात न लावता तो हळू हळू उघडला. मला तर दरदरून घामच फ़ुटला. काही तरी बाहेरचा प्रकार आहे अशी शंका मनाला ग्रासून गेली. जीप मुठीत धरून मी आत पाउल टाकले समोर कंड्क्टर उभा होता. तीकीट देण्यासाठी तो जवळ आला. त्याकडे तिकिटे तर नव्हतीच पण तो calucator सद्रृश्य ठोकळा घेउन आला होता. मी मान वर करून त्याकडे पाहिले. मग मात्र माझीच दातखीळच बसली. मला असा भास झाला की त्यानी मला हळुच smile दिले. मला गरगरून आले. पाच-दहा मिनिटांनंतर डोळ्यांसमोरील अंधारी कुठून तरी आलेल्या थंड हवेच्या झुळूकीनी दूर झाली. मी सहज कुतूहूल म्हणून थंड हवा कुठून येत आहे ते पाहिले. डोळ्यांसमोरील काळोखी आणखी गडद झाली. ती बस चक्क एअर कंडीशंड होती.
थोड्या वेळानी मी सावरलो. मग मी बस्चे निरिक्षण करायला सुरुवात केली. सुपर-बिल्ट्प एरीयामध्ये जसे बील्डर लोक हात सोडून कोमन एरीयासाठी जागा ठेवतात तशी बस च्या मध्यभागी मोकळी जागा होती. मी तिथे थोडेसे बागडून घेतले. बसचा पुढचा अर्धा भाग एकदम खाली होता. तीथे बसल्यानंतर व्हेनीसच्या गोन्डोल्यामध्ये प्रियेचा हात धरुन बसलो आहे असे वाटले (अहो, मी कसला जातोय व्हेनीसला, "दो लब्जोन्की है" मध्ये पाहिलेय तेवढेच) . बसचा मागचा भाग बराच उंचावर होता. तेल वीकून गब्बर झालेल्या कुणा अरबाला जर एअर कंडीशंड उंट करुन हवा असेल तर तो असाच दिसेल. (मी पेटंट करणार ही आइडीया: एअर कंडीशंड उंट).
तर अशा ऐटीत दोन्ही बाजुंच्या ट्र्याफ़िक मधील मारूती - शेवर्ले (ट) - होंडा सीटी वगैरे गाड्यांवर धुळ उडवत माझी यात्रा सुफ़ळ संपूर्ण झाली. (पूण्यातल्या छोट्या-छोट्या व खड्डे पडलेल्या रस्त्यातुन होंडा-सीटी वगैरे अवाढव्य गाड्या चालकाबद्दल माझे एक निरीक्षण आहे : गेल्या पिढीतील "जीव गेला तरी चालेल पण मी वाडा सोडणार नाही" अश्या पुणेरी बाण्याचे ते या पिढीतले अनुकरण आहे. हा एक वेगळाच मुद्दा होइल. म्हणुन असो. )
पूण्याचा portsmouth झाल्यासारखे वाटले. (कुठे आहे ते मला विचारु नका.). थंड हवा घेत घेत लार्ज साइझच्या खिडकीतुन पाहिले आणि बाकीची ट्र्यफ़िक, तीन तीन तास भार-नियमन, दिवसाआड येणारे पाणी, रस्त्यातील खड्डे वगैरे गोष्टी कद्रू वाटायला लागल्या.
पूण्यनगरीवरून परत एकदा नांगराचे सोनेरी फ़ाळ फ़िरले.
Wednesday, February 14, 2007
Subscribe to:
Posts (Atom)