कल्पना करा की तुम्ही एक गोष्ट पस्तिस वर्षे करताय. सर्वात महत्त्वाच म्हणजे यासाठी खुप जास्त धीर आणि एकाग्रता लागते. आता जर ती गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला कुटुम्बापासून नेहेमी दूर रहावे लागत असेल्, हाता-तोन्डाची गाठ होइल इतकाच तुटपुन्जा पगार मिळत असेल, तुम्ही केलेल्या उत्क्रूष्ट कामगीरीबद्दल जर कोणि तुमची पाठ थोपटण्याचीही तसदी घेत नसेल्, कुठेतरी सुदुर आदिवासी भागात आणि खेडेगावात काम करायला लागत असेल, जिथे मन लावून काम करणे अशक्य तर असतेच पण धोकादायक सुद्दा असते, तर ती गोष्ट हळु हळु खुपच अवघड होत जाते. पुन्हा त्यात तीन चुणुकदार वाटणारया मुलान्ची जबाबदारी म्हण्जे सर्व बाजुनी कोन्डमारा होत जातो. कारण आपण त्यान्च्या सन्गोपानामध्ये काही चुक तर करत नाहिये ना, त्याना सर्व सन्धी मिळतायात ना अशी टोचणी नेहमी मनाला लागलेली असते. खरेतर तो प्रत्येक कुटुम्बाचा निर्णय असतो, की महत्त्व कशाला द्यायचे. त्याच वेळी जर सुखसोयी हव्या असतील, हातात जास्त पैसा हवा असेल्, कुटुम्ब जवळ हवे असेल तर कुठेना कुठे याबाबतीत तडजोड करायला लागते. ही तड्जोड कधी करायची आणि कधी नाकारायची हा प्रत्येक कुटुम्बाचा निर्णय असतो.
दादानी देखील याबाबतीत निर्णय घेतला. आणि जर आपण चीत्रफीत विस वर्षे पुढे सरकावली तर आपल्याला त्या निर्णयाचा निकाल सुध्धा कळेल. दोन डाक्टर आणि एक इन्जिनीयर हा त्या निर्णयाचा निकाल आहे. पण या तीन बक्षिसान्मागे दोन जिवान्च्या उमेदिच्या काळातिल त्याग आहे. पूर्ण आयुष्यभर खतपाणी घालून वाढवलेल्या आणि जपलेल्या रोपाला आलेली तीन फळे आहेत्. सर्व बाजुनी अवाढव्य सन्कटे आली आणि त्यागाच्या अचल खडकावर आदळुन मातीमोल झाली. सन्कटे लाजुन दूसर्या दिवशी परत येण्यासाठी गेली. अशी पुष्कळ कुटुम्बे असतात जी अशा सन्कटान्चा सामना करतात. आमचे कुटुम्ब ही त्यापैकीच एक.
जेव्हा त्यान्ची नेमनूक जवळच्या गावी असायची अशा वेळी दादान्चा दिवस सकाळी साडेचार ला सुरु व्हायचा. पाच वाजता ते गणित आणि विज्ञानची शीकवणी घ्यायचे. ती साडे सहा पर्यन्त चालायची. तोपर्यन्त जेवण आणि डबा तयार असायचा. मुले उठायची आणि सगळे मिळुन सकाळी साडेसहा वाजता जेवायचो. मग दादा एकोन्विस किलोमिटर सायकल चालवत त्यान्च्या शाळेकडे जायचे. तिथे ते गणित शिकवायचे आणि विज्ञानाचा शीक्षक नसायचा म्हणून विज्ञान देखिल. नळ्गीर्, जीथून दहा वर्षात कोणीही दहावी पास झाले नव्हते तिथला गणित आणि विज्ञानाचा निकाल ८० ते १००% लागायला लागला.
ते दिवस अवघड असले तरीही आम्ही एकत्र असल्यामुळे सुखी होतो. आम्ही कधिही आठवड्याचे दोन चित्रपट चुकलो नाही. आमच्या कोणत्याही इछ्छा नाकारल्या गेल्या नाहीत. मला अजुन आठवते, मला महाराष्ट्राच्या सहलीला जाण्यासाठी पैसे नव्हते तर दादानी १००% महीना दरानी व्याज काढून मला सहलिस पाठवले. दादा एकदा नळ्गीर हून परत येताना ओढ्याला पूर आला आणि खिशातले ९०० रु., दादान्चा तेव्हाचा पगार्, भिजले. आई आणि दादा मिळून त्या पन्नासच्या नोटा रात्रभर स्टोव वर शेकवत होते. आम्हाला तेव्हा पैश्यान्ची इतकी चणचण होती.
पण आम्ही कधीही कोणाकडे आर्थीक मदत मागितली नाही. दादानी प्रत्येक दिवशी आनन्दात घालवला , खुप जास्त मेहेनत केली आणि कधीही कोणापुढे झुकले नाहीत. दादा उन्हाळ्याच्या सुट्टीत दहावीचे पेपर्स तपासायचे. आपल्या मुलान्चे मार्क्स वाढवण्यासाठी खुप लोक पैसे घेउन यायचे. त्यापैकी कुणाचे ही प्रयत्न सफळ झाले नाहीत्, पण कोणिही थन्ड शर्बत पिल्याशिवाय परतही गेले नाही.
पण सगळ्यात जास्त त्रास दादा लाम्बच्या गावी जायचे तेव्हा व्हायचा. ते आठवड्यातुन एक दोनदाच येवु शकायचे. आई व दादानी निर्णय घेतला होता की आई नोकरी न करता आम्हाकडे लक्ष देईल. आम्ही दादान्च्या नोकरिच्या गावी सुध्धा जाउन राहू शकलो असतो, किन्वा आईनी नोकरी केली असती तरीही त्या दोघान्चे कष्ट ही कमी झाले असते. पण दोघानी एक निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे तडीस नेला.
आता दादा रिटायर झालेले आहेत आणि त्यान्साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हन्जे त्यान्चे कुटुम्ब त्यान्जवळ आहे. त्यान्चा नातु त्यान्जवळ आहे, मला खात्री आहे की आयुष्यभराच्या कष्टाला आता फळ येते आहे. मी माझ्या मुलाच्या भवितव्याबद्दल निश्चिन्त राहू शकतो कारण त्याला वळण लावण्यासाठी आईदादा आम्हासोबत आहेत.
आतापर्यन्त सान्गितलेले जवळपास बर्याच जनान्ना माहिती आहे. आणि हे ही माहिती आहे की या गाड्याचे दुसरे चाक सुध्धा इतकेच खम्बीर होते म्हणून हा गाडा इथेपर्यन्त पोचु शकला. दादान्च्या निव्रुत्तीमद्ये तिचा ही खुप मोठा विजय लपलेला आहे.तिने सुद्धा खुप कष्ट सहन केलेले आहेत. लग्न झाले तेव्हा ती फक्त दहावी पास होती. ती बी.ए. झाली, एम्.ए. झाली. तीनी आम्हासोबत अभ्यास केला व परिक्षा पास झाली. एका गोष्टीचे मला खुप नवल वाटते. आई व दादा दोघान्कडे देखील कधिही वेळेची कमी नसायची. दादा नळगीर हून सायकलवर यायचे तरीही सीनेमा पाहाण्यासाठी आम्हाला नेहेमी वेळ असायचा. आईचा सुद्धा परिक्षा अस्ताना सुद्धा सकाळी साडेसहा वाजता स्वयम्पाक तयार असायचा.
नोकरी मिळणे शक्य असून देखील आईनी नोकरी केली नाही. ती आमच्या कुटुम्बाचा पाठीचा कणा आहे. मग कण्याचे सर्व गुणधर्म तिच्यात आहेत. दादा जेव्हा आठवडाभर बाहेर असायचे तेव्हा तीच कुटुम्ब प्रमुखाचे स्थान घ्यायची. कण्यासारखिच ती कडक आणि न वाकणारी आहे. तिच्या स्वाभिमानाचे काही मासले मला आठवतात आणि मग मला थोडेसे हसायला ही येते आणि आदरानी श्वास भरून सुद्धा येतो.
दादाना तर पुष्कळ लोकान्नी सेन्ड्-ओफ दिला. कार्यक्रम केला, आम्ही तिघे मिळुन आता आईलाही तिच्या रिटायर्मेन्ट बददल शुभेच्छा देतोय्. लग्नानन्तर आता प्रथमच आईला एकटीसाठी दादा भेटतायत. खरेतर आईचे काम वाढ्णार आहे. पण मला खात्री आहे की हे वाढलेले काम आई आनन्दानी करेल.
Monday, December 11, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Kandy kiti sopya bhashet man utarwatos kadada war..:) je sagalyanna shakya nahiye.
Kandy, too good. khup chaan lihila ahes ... All The Best ...
I am glad that I am sharing a birthdate with your father ... :)
Post a Comment